Ward Boy Viral Video दवाखान्यांमध्ये आता कशाचा नेम राहिलेला नाही, हे नित्याचेच झाले आहे. रुग्णांशी गैरवर्तन करण्याच्या घटना तर आता सर्रास पाहायला मिळतात. त्यातच शनिवारी एका अत्यंत घृणास्पद प्रकार घडला. एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या कानातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
घटनास्थळ:
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वॉर्डबॉयला अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा वॉर्डबॉय मृत तरुणीच्या कानातील दागिने चोरताना स्पष्ट दिसत आहे. तो दागिने काढताना तिच्या शरीराची हालचाल करत असल्याचेही दिसत आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव श्वेता असून, ती २६ वर्षांची होती. एका अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तिला शनिवारी रुग्णालयात आणले जात असतानाच तिचा मृत्यू झाला होता.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अपघातानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह तातडीच्या कक्षात पाठवला. जेव्हा पोलीस मृतदेह सील करण्याची प्रक्रिया करत होते, तेव्हा तिच्या कानातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात वॉर्डबॉय विजय हा दागिने चोरताना स्पष्टपणे दिसला.”
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आरोपीला अटक:
या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात जोरदार निदर्शने करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आरोपी वॉर्डबॉय विजय गुन्हा केल्यानंतर रुग्णालयातून फरार झाला होता, परंतु पोलिसांनी त्याला दुसऱ्याच दिवशी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.