‘तिला’ भेटायला आला आणि घरच्यांनी भररस्त्यात केली धुलाई, गर्लफ्रेंडचे केस ओढले अन् चपलेने… पाहा VIDEO

Boyfriend Beating अनेक प्रेमळ जोडपी अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना न सांगता भेटतात, पण जर तुमच्या पालकांनी तुम्हाला अशा स्थितीत पाहिलं तर काय होईल, हा विचारही भीतीदायक आहे. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

एका बाजारात एक तरुण त्याची गर्लफ्रेंडसोबत चाऊमीन खात होता. त्याचवेळी, तरुणाचे पालक तिथून जात असताना त्यांचं लक्ष त्यांच्या मुलाकडे गेलं. आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बघून त्यांना खूप राग आला आणि ते लगेच त्याच्या दिशेने निघाले. आई-वडिलांना आपल्याकडे येताना पाहून मुलगा घाबरला. त्याने त्वरित त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिथून पळण्याचा प्रयत्न केला. दोघेही स्कूटरवर बसून जात असताना, मुलाच्या पालकांनी त्यांना थांबवलं आणि मग रस्त्यावरच, लोकांसमोर दोघांनाही बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील गुजेनी भागातील राम गोपाल चौकात घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा २१ वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड १९ वर्षांची आहे. एका २१ वर्षीय मुलाला आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीला शुक्रवारी मुलाच्या पालकांनी सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या घटनेबद्दल स्थानिक पोलिसांनी माहिती दिली की, “रोहित नावाचा एक तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत रस्त्यावर चाऊमीन खात होता. त्याच वेळी त्याचे पालक शिवकरण आणि सुशीला तिथे आले. रोहितला मुलीसोबत बघून ते खूप संतापले. त्यांनी या नात्याला विरोध केला आणि त्यानंतर त्याला आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करायला सुरुवात केली.”

व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुलाची आई त्याला जोरदार मारत आहे आणि मागे बसलेल्या मुलीचे केस पकडून तिला ओढत आहे. त्याच वेळी मुलाचे वडील त्याला चपलेनं मारत आहेत. लवकरच तिथे बघणाऱ्या लोकांची गर्दी झाली आणि जवळच्या लोकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment