गाय म्हैस शेळी खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग देणार 100% अनुदान, लगेच अर्ज करा

Animal Husbandry Department scheme पशुसंवर्धन विभागाने पशुपालक, शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जून 2025 असून, अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजनांअंतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गट, शेळी-मेंढी गट यांचे वाटप केले जाणार आहे. यासोबतच, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांसाठी निवारा शेड उभारणीसाठी आर्थिक मदत, 100 कुक्कुट पिलांचे वाटप आणि 25 अधिक 3 तलंगा गटांचे वाटप या योजनांसाठी सन 2025-26 मध्ये ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

इच्छुक अर्जदारांनी https://ah.mahabms.com या वेबसाइटवर किंवा ‘एएच.एमएएचएबीएमएस’ या मोबाईल ॲपद्वारे अर्ज सादर करावा. अर्ज भरताना अर्जदारांना दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यापैकी आवश्यक असणाऱ्या योजनेची स्वतंत्रपणे निवड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज भरताना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीसंबंधी संदेश पाठवले जातील. त्यामुळे अर्जदारांनी कोणताही परिस्थितीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनांविषयी सविस्तर माहिती, तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

या संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सोपे असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करावा. अर्जदारांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत सूचना पाठविल्या जातील. त्यामुळे अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, याची काळजी घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी कळवले आहे.

याव्यतिरिक्त, अधिक माहिती मिळवण्यासाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रावरही संपर्क साधता येईल, असे पत्रकात नमूद केले आहे.

पशुसंवर्धन योजनेच्या लाभासाठी अर्जदारांनी एका योजनेसाठी एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत वैध राहील. म्हणजेच, 2021-22 पासून पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजेच 2025-26 पर्यंत ही सोय लागू असेल. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे आणि प्रतीक्षा यादीतील त्यांच्या क्रमांकानुसार अंदाजे कधी लाभ मिळेल याची माहिती त्यांना मिळू शकेल. त्यामुळे त्यांना लाभार्थी हिश्श्याची रक्कम भरणे किंवा इतर आवश्यक तयारी करणे शक्य होईल.

Leave a Comment