विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….;त्यांना वर काढण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

Dog snake fight viral video जंगलातील जीवन अनेक रहस्यांनी भरलेले असते आणि वन्यप्राण्यांविषयी लोकांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक चित्तथरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात त्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष पाहायला मिळतो. ‘शिकार करा किंवा शिकार व्हा’ हाच जंगलाचा नियम आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Murari Lal (@murliwalehausla24)

त्यामुळे प्रत्येक प्राण्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. सध्या सोशल मीडियावर एका विहिरीत पडलेल्या तीन कुत्र्यांचा जीवन-मरणाचा संघर्ष दाखवणारा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून कोणालाही भीती वाटेल.

विहिरीत मृत्यूशी झुंजणारे तीन श्वान

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Murari Lal (@murliwalehausla24)

या व्हिडिओमध्ये तीन कुत्रे एका खोल विहिरीत पडलेले दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विहिरीत काही विषारी साप आणि एक मोठी घोरपडदेखील आहेत. विहिरीत अडकलेले कुत्रे एका बाजूला मृत्यूशी लढत आहेत, तर दुसरीकडे भीतीमुळे ते एकमेकांवर भुंकत आणि लढत आहेत. अशा परिस्थितीत, एका सर्पमित्राने दाखवलेल्या बहादुरी आणि माणुसकीमुळे या कुत्र्यांचे प्राण वाचले. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून या असहाय्य प्राण्यांना विहिरीतून बाहेर काढले.

कुत्र्यांसाठी प्रत्येक क्षण होता जीवघेणा

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की तीन निष्पाप कुत्रे अचानक एका शेतातील विहिरीत पडतात. त्या विहिरीत आधीपासूनच विषारी साप आणि एक मोठी घोरपड असल्याने कुत्रे अधिकच भयभीत होतात. भीती आणि असुरक्षिततेमुळे ते स्वतःच्या बचावासाठी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, तर साप आणि घोरपडही त्यांना इजा पोहोचवण्याच्या तयारीत असतात. कुत्र्यांसाठी तो प्रत्येक क्षण अत्यंत कठीण आणि जीवघेणा होता. अशा स्थितीत, एका दयाळू सर्पमित्राने त्वरित हस्तक्षेप केला. त्याने दोरीच्या मदतीने विहिरीत उतरून एक-एक करून तिन्ही कुत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. विहिरीच्या बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांनीही दोरी पकडून सर्पमित्राला मदत केली, ज्यामुळे हे बचावकार्य यशस्वी झाले.

Leave a Comment