इमारतीला भीषण आग; बाल्कनीतून पोरांना खाली टाकलं; पुढे स्वतः उडी मारली अन्… धक्कादायक VIDEO

Ahmedabad Building Fire video आईच्या प्रेमाची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. ती आपल्या मुलांच्या प्रत्येक अडचणीत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धावून येते. आई म्हणजे उन्हाळ्यातील थंडगार सावली, पावसाळ्यातील सुरक्षित छत्री आणि थंडीतील उबदार शाल असते. म्हणूनच, कोणतीही दुःखं आली तरी तिच्या मायेच्या स्पर्शाने ती दूर होतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अहमदाबाद, गुजरात येथे घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. शुक्रवारी, अहमदाबादमधील एका उंच इमारतीला आग लागली. त्यामुळे इमारतीत एकच गोंधळ उडाला. रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. ही घटना खोखर सर्कल येथील परिस्कर १ अपार्टमेंटमध्ये घडली. आगीत अडकलेल्या तीन महिलांनी ज्या प्रकारे आपल्या मुलांना वाचवले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ पाहून क्षणभर तुमचा श्वासही रोखला जाईल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अहमदाबादमधील एका अपार्टमेंटमध्ये अचानक आग लागली आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काहींनी खिडक्यांना लटकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना खोखर सर्कलच्या पारिसकर १ अपार्टमेंटमधील आहे. या आगीच्या दुर्घटनेत १८ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, आता आग पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे सांगण्यात येत आहे.

आगीमुळे इमारतीत एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या दरम्यान, एका आईने आपल्या निष्पाप मुलांना खाली लटकवून वाचवले. खाली उभ्या असलेल्या लोकांनी या मुलांना सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर, त्या महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उडी मारली. नशीब बलवत्तर म्हणून खाली असलेल्या लोकांनी तिला पकडले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती महिला अक्षरशः उलटी लटकलेली दिसत आहे.

Leave a Comment