Daughter in law लग्नाच्या दिवसांमध्ये प्रत्येक नववधूला आपल्या सासूबाई कशा असतील याची चिंता वाटत असते. अनेकजणींना सासूच्या कठोर स्वभावाची भीती वाटते. मात्र, काही भाग्यवान नवऱ्या मुलींना सासूच्या रूपात आईच मिळते. सध्या सोशल मीडियावर एका सासूचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक मुलगी ‘मलाही अशी सासू हवी’ असे म्हणेल.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
सासू-सुनेच्या नात्याबद्दल अनेक कथा-किस्से आपण ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात, तर कधी मायेच्या ओलाव्याने हे नाते अधिक घट्ट होते. सोशल मीडियावर या नात्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या लग्नसराईचा काळ असून अनेक विवाह सोहळे पार पडत आहेत आणि यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशाच एका व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
सासू आणि सून यांच्यातील संबंधांवर आधारित अनेक मालिका टीव्हीवर दाखवल्या जातात, ज्यात त्यांच्यातील खटके आणि वाद पाहायला मिळतात. अनेक घरांमध्ये सासू-सुनेच्या नात्यात प्रेम कमी आणि तक्रारी जास्त असतात. बऱ्याच सुनांची तक्रार असते की सासू त्यांना आपल्या मुलीसारखे वागवत नाही, तर काही सासू म्हणतात की सून त्यांच्याशी आईसारखी वागत नाही. पण काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच सुंदर असते आणि याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ.
या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी तयार झाल्यावर जेव्हा सासू तिला पाहते, तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहून सगळेच सासू-सुनेच्या नात्याचे कौतुक करत आहेत. सासूबाई आपल्या होणाऱ्या सुनेला पाहून खूप आनंदी दिसत आहेत आणि तिचे भरभरून कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या सुनेच्या गालावर प्रेमळ चुंबनही घेतले. हा व्हिडिओ पाहून अनेक मुलींना त्यांच्या सासूकडून अशाच प्रेमळ वागणुकीची अपेक्षा आहे.