गर्मीपासून वाचवण्याची पठ्याचा जबरदस्त जुगाड; टेबल फॅनपासून घरीच तयार केला AC, फक्त ५० रुपयांत थंड हवा

Desi jugad मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. असह्य ऊन आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिक शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळत आहेत आणि घरातच राहणे पसंत करत आहेत. तथापि, अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडणे अपरिहार्य आहे. अशा परिस्थितीत, काही लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Pearl 💥 Ranjith (@muthuranji)

सध्या सोशल मीडियावर एका अशाच उपायाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. भारतीय नागरिक नेहमीच कल्पकतेने समस्यांवर तोडगा काढण्यात पटाईत असतात. आपल्या देशात कोणतीही वस्तू निरुपयोगी ठरत नाही, असे क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची संख्या कमी नाही. भारतीय लोक असे अनोखे उपाय शोधून काढतात की ते पाहून मोठे इंजिनियरसुद्धा आश्चर्यचकित होतील. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या मनोरंजक व्हिडिओंचा पूर असतो आणि अनेक विनोदी व्हिडिओ आपल्याला हसवून जातात. याच श्रेणीत जुगाडू व्हिडिओ येतात. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून काहीतरी नवीन आणि उपयुक्त बनवले जाते, ज्यामुळे सोशल मीडियावरील वापरकर्ते या जुगाडू लोकांचे कौतुक करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pearl 💥 Ranjith (@muthuranji)

देशभरात तापमानाचा आलेख वाढतच चालला आहे. या तीव्र उष्णतेत लोक घराबाहेर पडण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. परंतु काही हुशार व्यक्तींनी या गर्मीवर मात करण्यासाठी एकापेक्षा एक अद्भुत आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधले आहेत. विशेष म्हणजे, हे उपाय कोणत्याही वातानुकूलित यंत्र (AC) किंवा कूलरपेक्षा कमी प्रभावी नाहीत. एका तरुणाने तर चक्क टेबल फॅनचा वापर करून AC तयार केला आहे. आणि हा उपाय करण्यासाठी केवळ ५० रुपयांचा खर्च येतो, परंतु त्यातून मिळणारी हवा AC पेक्षाही जास्त थंडगार असते. हा जुगाड करून तुम्ही तीव्र उन्हाळ्यातही गुलाबी थंडीचा अनुभव घेऊ शकता.

सध्या एकीकडे हवामानात वारंवार बदल होत असले तरी, दुसरीकडे उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक विविध प्रकारचे जुगाड करत असलेले दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक खास व्हिडिओ समोर आला आहे, जो रखरखत्या उन्हाळ्यात लोकांना मोठा आराम देत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एका तरुणाने हा अनोखा AC बनवण्यासाठी फक्त एक टेबल फॅन, प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक पाईप आणि बर्फ या चार वस्तूंचा वापर केला आहे. या सर्व वस्तूंच्या मदतीने तो काही क्षणात AC प्रमाणे थंड हवा देणारा पंखा तयार करतो. तुम्हीही हा जुगाड करून AC शिवाय AC सारख्या थंड हवेचा आनंद घेऊ शकता. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या उष्णतेची काळजी करण्याची गरज नाही.

Leave a Comment