Groom bride viral video लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र बंधन. यानंतर त्यांच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होते. अनेक स्वप्नं घेऊन हे जोडपं एकत्र येतं आणि आपलं जीवन आनंदाने पुढे नेतं. कुटुंबातील सदस्यही या विवाहसोहळ्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. मोठ्या थाटामाटात लग्न पार पडतं आणि आपल्या मुलीला चांगला जीवनसाथी मिळावा, अशी सगळ्यांची इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
अनेक नववधू आपल्या नवऱ्याला खास अनुभव देण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. तर काही मुली लग्नातही नवऱ्याचा आदर करत नाहीत. याचंच एक उदाहरण म्हणजे एका नवरीने भरलेल्या लग्नात आपल्या नवऱ्याचा घोर अपमान केला आहे. या नवरीने बिचाऱ्या नवऱ्यासोबत स्टेजवर सर्वांसमोर असं काही कृत्य केलं, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आता तुम्ही विचाराल की नवरीने नेमकं काय केलं? तर या नवरीने स्टेजवर येत असताना नवऱ्याने पुढे केलेल्या हातावर थुंकली आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव स्टेजवर नवरीची वाट बघत उभा आहे. नवरी येते आणि तिला स्टेजवर चढायला मदत करण्यासाठी नवरदेव आपला हात पुढे करतो. पण त्यावेळी नवरी नवऱ्याच्या हातात हात देण्याऐवजी थेट त्याच्या हातावर थुंकते. नवरी खूप रागात दिसत होती आणि तिचा तो अवतार पाहून सगळेच स्तब्ध झाले. या घटनेमुळे नवरदेवासह सगळेच लोक शॉक झाले. नवरीच्या या कृत्यावर जोरदार टीका होत आहे आणि शेवटी नवरदेव हे लग्न मोडतो.