धावत्या ट्रेनमधून उतरताना गेला तोल, तरुणी आपटली तोंडावर अन्…; अंगावर काटा आणणारा VIDEO

Railways accident ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे, हे वारंवार सांगूनही लोकांमध्ये सुधारणा दिसून येत नाही. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोकादायक कृत्य करतात. धावत्या ट्रेनमधून उतरण्याची काही लोकांची सवय जीवघेणी ठरू शकते.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

https://x.com/i/status/1918958958640808170

सोशल मीडियावर रेल्वे अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहून भीती वाटते. मात्र, काही दिवसांनंतर लोक हे सर्व विसरून पुन्हा त्याच चुका करतात. सध्या सोशल मीडियावर एका अशाच रेल्वे अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभी राहून उतरण्याचा प्रयत्न करते. उतरताना तिचा तोल जातो आणि ती तोंडावर पडते. त्यानंतर जे घडते ते अत्यंत भयानक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

https://x.com/i/status/1918958958640808170

ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात तरुणी गंभीर अपघाताला बळी

हा व्हिडिओ रेल्वे प्रवासादरम्यान लोक कशा प्रकारे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्टपणे दाखवतो. व्हिडिओमध्ये एक तरुणी ट्रेनच्या दारात उभी राहून प्रवास करत आहे. चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याच्या प्रयत्नात ती एका गंभीर अपघाताला कशी बळी पडते हे यात दिसते. या व्हिडिओचा शेवट खूपच विचलित करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, रेल्वे स्टेशन येण्यापूर्वीच त्या तरुणीला धावत्या ट्रेनमधून उतरण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ती दाराला लटकून उभी राहते. मागे उभे असलेले प्रवासी तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की, गाडीचा वेग खूप जास्त आहे, तू उतरू नकोस. पण ती कोणाचेही ऐकत नाही आणि पुढच्याच क्षणी ती ट्रेनमधून उडी मारते.

उडी मारताच ती रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या खडीवर जोरदारपणे तोंडावर आदळते. ट्रेनचा वेग इतका जास्त होता की, त्या तरुणीला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. व्हिडिओच्या शेवटी, ती तरुणी उडी मारल्यानंतर त्याच अवस्थेत रुळांच्या बाजूला पडलेली दिसते.

Leave a Comment