भररस्त्यात तरुणांची बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन्… थरारक घटनेचा VIDEO

Road side riding accident रस्त्यावर वाहन चालवताना नेहमी सावकाश आणि सुरक्षितपणे चालवा, असं वारंवार सांगितलं जातं. तरीही अनेक तरुण केवळ दिखावा करण्यासाठी आपल्या जीवाशी खेळताना दिसतात. त्यांना बाईक म्हणजे खेळणं वाटतं आणि ते बेफिकिरीने रस्त्यावर चालवतात. स्वतःच्या जीवाचं तर त्यांना मोल नसतंच, पण ते इतरांच्या आयुष्याचीही पर्वा करत नाहीत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अशा स्थितीत, स्टंटबाजीच्या नादात ते स्वतःसोबत इतरांनाही धोक्यात टाकतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या बाईकवरील जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तुम्ही अनेकदा एक्स्प्रेस वेवर पाहिलं असेल, काही तरुण अत्यंत वेगात बाईक चालवतात आणि धोकादायक स्टंटबाजी करताना दिसतात. बाईक स्टंटबाजीसाठी नियमित सराव गरजेचा असतो, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात, हे अनेकदा समोर आलेलं आहे. मात्र, आजकाल कोणताही अनुभव किंवा सराव नसताना, केवळ बाईक हातात आहे म्हणून काही तरुण बेजबाबदारपणे स्टंटबाजी करताना दिसतात.

बाईकवरचे दोन्ही तरुण खाली कोसळले आणि…

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही तरुण एका एक्स्प्रेस वेवर खूप वेगात बाईक चालवत आहेत. रस्त्यावर जमेल तशी वाकडी-तिकडी बाईक चालवत ते मजा करत होते. अचानक, पुढे असलेली एक बाईक वेगात गेली आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या बाईकस्वाराचा स्टंट करताना तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात बाईकवर बसलेले दोन्ही तरुण जोरदारपणे खाली आदळले आणि अनेक कोलांट्या मारत रस्त्यावर फरफटत पुढे गेले. त्याचवेळी मागून एक ट्रक वेगाने येत होता, पण नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही तरुण कसेतरी उठले आणि धावत रस्त्याच्या बाजूला गेले. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, हे तरुण स्टंटबाजी करत असताना त्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. जर ते चुकूनही ट्रकच्या चाकाखाली आले असते, तर खूप मोठा अनर्थ झाला असता. मात्र, त्यांच्या नशिबाने त्यांना वाचवलं.

या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @Lollubee नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘यांना पाठिंबा न देता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करायला हवी.’ तर दुसऱ्याने म्हटलं आहे, ‘अजून करा रीलबाजी, असंच काहीतरी होऊ शकतं तुमच्यासोबत.’ तिसऱ्या युजरने या घटनेला ‘विचार न करता केलेली स्टंटबाजी आणि निष्काळजीपणाचं फळ’ असं म्हटलं आहे.

Leave a Comment