बापरे! यापुढे फळे विकत घेताना शंभर वेळा विचार कराल, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

viral video of seller घरातील मोठी माणसे नेहमीच हॉटेलमधील जेवण टाळण्याचा सल्ला देतात, कारण तेथील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबद्दल त्यांना शंका असते. अनेक मोठ्या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात उंदीर, पाल आणि झुरळे फिरताना दिसतात, अशा बातम्या आणि व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. काही हॉटेल्समध्ये तर दूषित तेल वापरले जाते. म्हणूनच घरात बनवलेले पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. लहानपणापासून आपण फळे पौष्टिक असतात हे ऐकले आहे. पण आता जर कोणी तुम्हाला सांगितले की फळांमध्येही विष असू शकते, तर? आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी डॉक्टरसुद्धा फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tez Marathi (@tez_marathi)

परंतु, जर तुम्हाला कळले की तुम्ही घेतलेली फळे गटाराच्या पाण्यात धुतलेली आहेत, तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक विक्रेता विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे गटाराच्या घाण पाण्यात बुडवून स्वच्छ करताना दिसत आहे, हा प्रकार पाहून लोकांना खूप वाईट वाटले. मेथीची भाजी असो किंवा कोणतीही पालेभाजी, या भाज्या किंवा फळे नेमकी कुठे धुतली जातात हे आपण कधी पाहिले आहे का? यापूर्वीही पालेभाज्या गटाराच्या पाण्यात धुतल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. एका विक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे गटाराच्या पाण्यात धुतल्याचा घृणास्पद प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tez Marathi (@tez_marathi)

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या अस्वच्छतेबद्दल अनेकांनी राग आणि चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर नेहमी आरोग्यदायी आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे आता लोकांना त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेबद्दल शंका येऊ लागली आहे.

Leave a Comment