Woman suddenly jumped in front of a train राजधानी मुंबईच्या लोकलमध्ये होणारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही एक गंभीर समस्या आहे. अनेकदा लोक रेल्वेखाली येऊन आत्महत्या करतात, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ‘जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही’ हे वारंवार सांगितले जात असूनही, अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक धोकादायक स्टंट करतात, तर काहीजण रोजच्या धावपळीच्या जीवनात निष्काळजीपणे वागून स्वतःला धोक्यात टाकतात. रेल्वे रूळ ओलांडू नका आणि रेड सिग्नल असल्यास रस्ता ओलांडू नका, असे सतत बजावले जाते.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
https://x.com/i/status/1910325667792568450
आजकाल, अनेक लोक अडचणींना कंटाळून थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. विष पिऊन, गळफास लावून किंवा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचे भांडार आहे. दररोज हजारो व्हिडिओ येथे पाहायला मिळतात आणि ते झपाट्याने पसरतात. या माध्यमांवरील काही व्हिडिओ आपल्याला भावूक करतात. सध्या ट्विटरवर एका अशाच व्हिडिओची चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आत्महत्या करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
https://x.com/i/status/1910325667792568450
रेल्वे अपघातांच्या बातम्या आपण रोज ऐकतो. यातील अनेक अपघात हे लोकांच्या स्वतःच्या चुकीमुळे घडलेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, तर कधी दारात उभे असताना तोल जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसते की, एका महिलेने अचानक वेगळ्या वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर उडी घेतली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एका महिलेने अचानक हाय-स्पीड ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चालकाने त्वरित ब्रेक लावले, ज्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र, या व्हिडिओमध्ये तिच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. या घटनेचा थरारक क्षण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर करताच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.